- KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
- +91 9960609232
एकेकाळी ‘सोने कि चिडिया’ या नावाने ओळखला जाणारा भारत देश दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत जगाला अन म्हणूनच त्या गुलामगिरीत तावून निघालेले अनेक देशभक्त या भारतभूमीला मिळाले. या आशा अनेक देशभक्तांच्या बलिदानानं, विचारांनं, अन विविध मतप्रवाहांनी एकत्र येऊन या पवित्र मातृभूमीला स्वतंत्र केलं. या भारतभूमीच्या स्वातंत्र लढ्यात आपलं थोडस योगदान देण्याच्या उद्देशाने २८ जून १९२३ रोजी नासिक जिल्ह्यातील पाटोदा या गावी आई सुंदराबाई आणि वडील हरिभाऊ नाईकवाडी यांच्या पोटी एक सुंदर गोंडस बाळ जन्माला आल. ते बाळ पुढे एक स्वातंत्रसेनानी,गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा अगस्ति परिवाराचे ‘बाबा’ या नावाने आपलं आस्थित्व रेखाटल.
मुळातच एक प्रेमळ, मितभाषी अन संयमी स्वभाव असलेल्या बाबांचं प्राथमिक शिक्षण नासिक जिल्ह्यातील पाटोदा या गावीच झालं. वडील त्यावेळी पोलीस सेवेत असल्याकारणाने सतत होणारी बदली त्यामुळे त्याचं माध्यमिक शिक्षण नासिक व संगमनेर या ठिकाणी झालं अन B.A. B.T. M.Ed. हे महाविद्यालयीन शिक्षण नासिक आणि मुंबई याठिकाणी पूर्ण केलं. शिक्षण घेत असताना बाबांनी इंग्रजांच्या गुलामगिरीचे चटके, समाजातील लोकांचे दुख:, गरजा स्वताच्या डोळ्यांनी पहिल्या अन अनुभवल्या होत्या. त्यामुळे त्यांचा स्वभाव करारी अन अन्यायाविरुद्ध लढणारा बनला. आणि याच ज्वलंत विचारांनी त्यांनी १९४२ च्या स्वातंत्र लढ्यात सहभाग घेतला अन अकोले तालुक्यात पोस्टाच्या पेट्या जाळणे, विजेच्या तारा तोडणे यातून इंग्रजांविरुद्ध निषेध नोंदवला. यावरून अस दिसत कि बाबांवर त्याकाळच्या आशा अनेक देशभक्तांचा प्रभाव दिसून येतो. त्यातूनच त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि तेंव्हापासूनच बाबांनी आपण या समाजाचे काहीतरी देणे आहोत हे ओळखले आणि त्यानुसार जीवनाची रूपरेखा तयार केली.
पुढे बाबांनी आपलं शिक्षण पूर्ण करून, त्याकाळचे मुंबईचे नावाजलेले दोन हायस्कूल एक छबिलदास हायस्कूल आणि दुसरे शिरोडकर हायस्कूल या दोन्ही ठिकाणी अध्यापनाचे कार्य सुरु केले. याठिकाणी काम करत असताना मितभाषी, अंतर्मुख असणारे बाबा एका वेगळ्या विश्वात विचार मग्न होते. ते म्हणजे त्यांचा बराचसा काळ अकोले या ठिकाणी गेलेला होता तसेच स्वातंत्र लढ्यातील अकोल्यातील सहभाग त्यांना शांत बसू देत नव्हता. मुंबईत अध्यापनाचे काम करत असताना त्यांना एक गोष्ट समजली होती ती ‘शिक्षण’! कारण बाबांना समजले होते कि, भविष्यात स्वताला खडकावर विश्व निर्माण कारायचे असेल तर एकच गोष्ट आपल्याला तारू शकते ती म्हणजे शिक्षण. म्हणून बाबांनी आपल्या भावंडाना शिक्षित केले. बाबांचा हाच वैज्ञानिक दृष्टीकोन, काळाला तत्परतेने ओळखण्याची कला आणि त्या दिशेने योग्य पाउल उचलण्याचे ज्ञान त्यांची महानता सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे.
म्हणतात कि, स्वातंत्र आणि समता हि मेंदूत जन्म घेते आणि बंधुता हि हृदयात. यापैकी स्वातंत्र लढ्यात भाग घेऊन त्यांनी स्वातंत्र आणि समता सिद्ध केली होती अन हृदयात असलेली बंधुता जोपासण्याच्या विचारात ते होते. मुंबईत असताना त्यांनी आपल्या गावाकडील अंधारात आणि अज्ञानाच्या दरीत रेंगाळणाऱ्या लोकांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे ठरविले होते. हाच विचार त्यांना शांत बसू देत नसे. हीच हृदयातील बंधुता आपल्या लोकांप्रती जोपासण्यासाठी ८ मे १९५८ साली मुंबईतील स्वताच्या घरात काही सहकार्यांच्या मदतीने श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हे करण्यामागे त्यांचा विचार थोडासा वेगळा होता, त्यावेळी शिक्षण हि संकल्पना संकुचित स्वरुपाची होती. समाजातील बहुजन शिक्षणापासून दूर होते अन हीच असमानता त्यांना रुचत नव्हती. असा सर्वसमावेशक विचार या संस्था स्थापणेमागे होता. बाबांना माहित होते कि केवळ शिक्षण हि एकच गोष्ट जग बदलू शकते.
इंग्रजीत म्हणतात,- ‘Gold has also to face the fire to prove itself.’ सोन्याला स्वताला सिद्ध करण्यासाठी अग्नीला सामोरे जावे लागते. तसं हे सगळ विश्व उभ करताना बाबांना अनेक संकटाना तोंड द्याव लागलं.पण समोर संकटांचा डोंगर असून सुद्धा हा देशभक्त डगमगला नाही. त्यावेळी पगारी नौकरीचा राजीनामा देऊन १२ जून १९६६ रोजी सह्याद्री विद्यालय, ब्राम्हणवाडा येथे आणि १९ जून १९६६ रोजी अगस्ति विद्यालय, अकोले येथे हि दोन विद्यालये अवघ्या पाच, दहा विध्यार्थी संख्येवर स्थापन केली.हि बाबांची ज्वलंत देशभक्तीच होती.. अन हे सगळ करत असताना बाबांनी कधीच स्वार्थी, लोभी विचारांची भुरळ मनाला होऊ दिली नाही. एवढच काय या शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांना अडचणीच्या काळात स्वतःच्या खिशातील पैसे देऊन मदत केली. बाबा हे सगळ देशभक्तीच्या विचारांनी करत होते. त्यातून त्यांनी कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. म्हणून तर संस्थेचे ब्रीद सुद्धा त्यांच्या विचारांशी जुळते असेच ठेवले - कर्मण्यवाधीकारस्ते माफलेषु कदाचन या तत्वाने बाबा आयुष्यभर चंदनासारखे झिजत राहिले.
त्यावेळी त्यांनी ठरविले असते तर, सबंध अकोले तालुकाभर शाळा उभारू शकले असते, पण त्यांना ते मान्य नव्हते. बाबांना शिक्षणाच्या कळसाची उंची नव्हती वाढवायची तर शिक्षणाच्या क्षितीजाची रुंदी वाढवायची होती. म्हणजे त्यांचा दर्जेदार शिक्षणावर भर होता.म्हणून त्यांनी काही मोजक्या ठिकाणी संस्थेच्या शाखा सुरु केल्या. हा बाबांचा वैज्ञानिक चेहरा नजरेस येतो. आजमितीस संस्थेची ०९ विद्यालये ०३ उच्च माध्यमिक विद्यालये तालुक्यात विविध ठिकाणी यामध्ये अकोले, ब्राह्मणवाडा, कळस, सुगाव, देवठाण, वीरगाव, पिसेवाडी, टाकळी आणि पिंपळगाव निपाणी या ठिकाणी संस्थेची विद्यालये कार्यरत असून पाच हजार विध्यार्थी दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षण घेत आहेत.
स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बाबा १९६७ साली अगस्ति विद्यालय अकोले या ठिकाणी मुख्याध्यापक झाले अन ३१ ऑक्टो.१९८१ ला ते सेवानिवृत्त झाले. बाबांच्या या महान कार्याला १९७५ साली शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने आणि अकोले गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
बाबांच्या या गरुडझेप घेणाऱ्या विचाररूपी पंखांना बळ देण्याच काम त्यांच्या पत्नी दुर्गाबाई नाईकवाडी यांनी केलं. त्यांनी कुटुंब सांभाळून एक शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य केलं. म्हणूनच त्यांना हे सगळ विश्व उभ करता आल. बाबांच्या या यशस्वी जीवनात आईंची भूमिका अनन्यसाधारण आहे. आज सर्व शिक्षक बाबांनी घालून दिलेल्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत ज्ञानदानाचे कार्य करत असून संस्थेच्या उत्कर्षासाठी अहोरात्र झटत आहेत. त्याचेच फलित म्हणून संस्थेचे अनेक विद्यार्थी विविध पदांवर देश-विदेशात कार्यरत आहेत,तसेच आज संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण, कला आणि क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करत आहे.
आशा या शिस्तप्रिय, ध्येयनिष्ठ, देशभक्त, स्वातंत्रसेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा बाबांचे २९ डिसेंबर २००९ रोजी वयाच्या ८७ वर्षी वृद्धापकाळाने देहासन झाले.
‘’Those who live for others are alive, those who live for themselves are dead.’’
बाबा तुम्ही नेहमी दुसऱ्यांसाठी जगलात,झिजलात त्यामुळे तुम्ही सदैव आमच्यामध्येच आहात. तुमच्याच प्रेरणेने आम्ही यशाचं शिखर चढत आहोत अन तुमच राहिलेलं अपूर्ण स्वप्न साकारत आहोत.
‘’बाबा तुम्ही तत्वाचे पुजारी
तुम्ही बहुजानाचे कैवारी
अन सामान्यांचे वारकरी
साक्षरतेची पालखी प्रत्येक वारकऱ्याच्या घरी पोचविणाऱ्या आमच्या बाबांना त्रिवार वंदन !!
‘अर्घ्य’ म्हणजे स्वतःजवळ असलेले ज्ञान, संपत्ती असे सर्व काही इतरांच्या कल्याणाकरिता अर्पण करणे होय. ते अर्पण करताना मन सुद्धा शुद्ध,पवित्र आणि प्रसन्न असावे असे शुद्ध नि पवित्र मनाचे थोर स्वातंत्र सेनानी गुरुवर्य बा.ह.नाईकवाडी सर तथा बाबा यांनी आपल्या जीवनात स्वतःजवळ असलेलं सर्व काही याच सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या आदिवासी,बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षित करण्यासाठी स्वतःजवळील सर्व ज्ञान समर्पित करून या संपूर्ण समाजाच्या उद्धाराचे कार्य संबंध जीवनभर केलं.
यासाठी बाबांनी स्वतःची पगारी नोकरी सोडून देण्याचा धाडसी निर्णय घेताने सुद्धा विचार केला नाही इतका दृढ विश्वास स्वतःवर आणि स्वताच्या निर्णयावर होता. म्हणतात ना पूर्ण मनापासून आपण जेंव्हा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो तेंव्हा ती गोष्ट आपल्याला मिळून देण्यासाठी या पृथ्वीवरील सर्व शक्ती एकवटून आपल्याला मदत करत असते, असचं काहीस बाबांबद्ल म्हणव लागेल.
बाबांनी संबंध आयुष्य दुसऱ्याला देण्यात झोकून दिले अन त्यात त्यांनी फळाची अपेक्षा ठेवली नाही. म्हणून बाबांनी शिक्षणाचा वसा घेतलेल्या आपल्या शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य सुद्धा स्वतःच्या आचारनानुसारच ठेवलेले आहे अस वाटत, ||कर्मण्यवाधिकारस्ते | माफलेषु कदाचन|| बाबांनी हीच शिकवण आपली मुल आणि संस्थेतील शिक्षक यांना दिली अन त्याचाच परिपाक कि काय आजही सर्वजण स्वतःला झोकून देऊनच काम करतात अन याच विचाराने बाबा आमच्यातच आहे अस मानतात.
मातोश्री दुर्गाबाई बाबुराव नाईकवाडी B.A.B.ed.
सेक्रेटरी
श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी मुंबई
जन्म: ३१ मे १९३५
श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी मुंबईचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा बाबा, यांनी अकोले तालुक्यातील बहुजनांच्या शैक्षणिक उद्धारासाठी संस्थेची स्थापना केली त्या सर्व पवित्र कार्याला सोबत अन साक्षीदार असणाऱ्या आमच्या अगस्ति परिवाराच्या आई मा. दुर्गाबाई नाईकवाडी. म्हणतात ना, “Behind every successful person, there is a woman.” प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. त्याप्रमाणे आईंनी स्वतः बाबांच्या प्रत्येक कार्याला खंबीरपणे साथ देऊन बाबांना यशाच्या शिखरापर्यंत पोहचविण्यासाठी मोलाची साथ दिली.
आई सुद्धा त्याकाळच्या हिंदी आणि भूगोल पदवीधर शिक्षण घेतलेल्या शिक्षित महिला होत्या म्हणून त्यांना शिक्षणाचे महत्व माहित होते. बाबांच्या बरोबरीने आईसुद्धा शैक्षणिक क्षेत्रात कुठेही मागे दिसत नाही. त्यामुळे बाबा जे काही करत होते ते अगदी योग्य आहे याची जाणीव आईंना होती.
आईंनी स्वतः घर सांभाळून शिक्षण क्षेत्रात ३२ वर्ष एक उत्कृष्ठ शिक्षिका म्हणून हिंदी आणि भूगोल हे विषय अध्यापनाचे काम केले आणि आपले ज्ञान या समाजातील सर्व मुलांपर्यंत पोहचवून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे बहुमोल काम आई आणि बाबांनी एकत्रितपणे केले.
बाबांचे २००९ साली देहावसन झाले त्यानंतर आईंनी स्वतः संस्थेची सेक्रेटरी पदाची सूत्रे हाती घेऊन आजतागायत संस्थेचा कारभार आईंच्या मार्गदर्शनखाली यशाच्या शिखरापर्यंत पोहचला आहे. आईंच्या मार्गदर्शनाखाली आज संस्था प्रत्येक शैक्षणिक उपक्रमांमध्ये यशाचे शिखर गाठत आहे.
मा. श्री शिरीषजी बाबुराव नाईकवाडी
कार्याध्यक्ष
श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी मुंबई
मा. श्री सतीशजी बाबुराव नाईकवाडी
कार्याध्यक्ष
श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी मुंबई
मा. श्री. संदीपजी बाबुराव नाईकवाडी
कार्याध्यक्ष
श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी मुंबई