- KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
- +91 9960609232
श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी,मुंबई संचलित महात्मा फुले विद्यालय सुगाव बु हे श्री अगस्ति ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत व प्रवरा माईच्या काठावर वसलेल्या सुगाव भूमीत केवळ बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना त्यातही विशेषतः विद्यार्थिनींना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने 1972 मध्ये संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी व थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा ह नाईकवाडी सर तथा बाबा यांनी या विद्यालयाची स्थापना केली. अनंत अडचणींना तोंड देत केवळ ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या संस्थेत ज्ञानदान करण्यासाठी गुववत्ताधारक विश्वासू सहकारी घेत एक दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी अथक परिश्रम घेतले. एक ओजस्वी, तपस्वी ,ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वश्रुत परिचयाचे असल्याने आजही त्यांचे पश्चात त्यांनी जपलेले गुणात्मक , शैक्षणिक व सामाजिक संस्कार लक्षात घेऊन आमच्या विद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे . विद्यालय सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून सुगाव बु , परिसरातील मनोहरपूर, वाशेरे आदी गावातील ग्रामस्थांचे सहकार्य सतत असते. एस एस सी परीक्षेचा निकाल आत्तापर्यंत तब्बल चार वेळा झळकल्याने शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत नेण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष सौ शैलजा पोखरकर , सेक्रेटरी आदरणीय दुर्गाबाई नाईकवाडी तथा आई ,संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी व संदिप नाईकवाडी यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळते आहे.
* दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी भारतीयम हा लेझिम प्रकार सादर करण्यासाठी दोन विद्यार्थिनींची
* एस एस सी परीक्षा - विद्यालयाचा चार वेळा 100 टक्के निकाल
* राष्ट्रीय पातळीवर रस्सीखेच स्पर्धेत पदक प्राप्त विद्यार्थिनी
* इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर जादा तासिका व सकाळ अभ्यासिकांचे नियोजन
* इयत्ता 5 वी व 8 वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा जादा तासिका व विशेष मार्गदर्शन
* इयत्ता 5 वी साठी नवोदय परीक्षा मार्गदर्शन
* गुरुवर्य बा ह नाईकवाडी सर तथा बाबा यांचे जयंती व पुण्यतिथी निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग
* खो- खो ,कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबाल स्पर्धेत तालुका व जिल्हा पातळीवर विद्यालयाच्या संघाची विशेष कामगिरी
* तालुका स्तरीय गणित- विज्ञान प्रदर्शनात दरवर्षी सहभाग
* शासकीय विज्ञान इंस्पायर अवॉर्ड साठी दरवर्षीआदर्श मॉडेल
* तालुका व जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धेत सक्रिय सहभाग
* MTS / NMMS परीक्षेसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
* दरवर्षी शिक्षक -पालक संघ ,शालेय व्यवस्थापन , माता - पालक संघ आदी शालेय स्तरावरील समित्या मार्फत वेळोवेळी सहविचार सभेचे आयोजन
* शालेय गुणवत्ता वाढीसाठी वर्गवार पालक मेळाव्यांचे आयोजन
* माता पालक यांचेसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम ( बालसंगोपान , मुलींच्या समस्या आदी )
* गणेशोत्सव ,शिवजयंती उत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन
* शैक्षणिक सहली, क्षेत्र भेट, विविध गुणदर्शन , क्रीडा स्पर्धा आयोजन.