• KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
  • +91 9960609232

Kaleshwar Vidyalaya Kalas Bu.

Phone Whasapp

माझ्या प्रिय विद्यार्थी आणि पालक वर्ग तुम्हाला माहीतच आहे की, आजचे युग हे ज्ञान-विज्ञानाचे आहे. आज संगणक शास्त्राला अतिशय महत्त्व आहे . जीवनात यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. इंग्रजीत असे म्हणतात की “There is no shortcut to success” म्हणजे यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमांशिवाय पर्याय नाही. स्वर्गीय गुरुवर्य बा.ह. नाईकवाडी तथा बाबा यांनी कठोर परिश्रमातूनच अगस्ती एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेचे एक छोटेसे रोपटे म्हणजे आपले कळसेश्वर विद्यालय कळस बु या विद्यालयाची स्थापना सन 1982 मध्ये बाबांनी केली. या गावातील कळसेश्वर मंदिराच्या नावावरून विद्यालयास नाव दिले गेले . या विद्यालयावर ब्रह्मलीन सुभाष पुरी महाराजांचा कायम वरदहस्त राहिला.या विद्यालयाची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे नमूद करता येतील.

आमच्या विद्यालयात वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबविले जातात.


१. २९ जून या दिवशी संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी गुरुवर्य बा.ह.नाईकवाडी सर तथा बाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो.


२. गणेशोत्सव – यावर्षी सालाबादप्रमाणे शाळेत श्रींची स्थापना करण्यात आली व गणेशोत्सव साजरा करण्यात आला.


३. छत्रपती शिवाजी महाराज जयंती- दरवर्षी सालाबादप्रमाणे १९ फेब्रुवारी या दिवशी विद्यालयात शिवजयंती साजरी केली जाते.


४. सावित्रीबाई फुले जयंती – ३ जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते.


५. महिला दिन – ८ मार्च या दिवशी शाळेत महिला दिन साजरा करून महिलांचा सन्मान केला जातो.


६. सहल- दरवर्षी विद्यालयाची शैक्षणिक सहल कोकण दर्शन,हरिहरेश्वर,रायगड,गणपतीपुळे.डेरवण,अलिबाग बीच.महाबळेश्वर,पाचगणी,वेरूळ,अजिंठा लेणी या वेगवेगळया ठिकाणी साली आयोजित केल्या गेल्या.


७. विविध गुणदर्शन कार्यक्रम- विविध गुणदर्शन मध्ये समूह नृत्य,वैयक्तिक नृत्य,समूह गायन,वैयक्तिक गायन, नाटिका,विनोदी नाट्य छटा, देशभक्तीपर गीत आणि नृत्य आदी कार्यक्रमाचा समावेश केला जातो.


स्पर्धा परीक्षा

पूर्व माध्यमिक शिष्यृत्ती- इ.८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी या शिष्यृत्ती परीक्षेचे ज्यादा तास घेऊन मार्गदर्शन केले जाते. यामध्ये विशेष प्राविण्य मिळविणारे विदयार्थी खालील प्रमाणे-


सन २०१६-१७
१.चौधरी आलीशा भारत - जिल्हा गुणवत्ता यादीत
२.कातोरे ज्ञानेश्वरी शशिकांत - जिल्हा गुणवत्ता यादीत
सन २०१७-१८
१.वाकचौरे अनघ संजय – पात्र
सन २०१९-२०
१.वाकचौरे पायल संजय- जिल्हा गुणवत्ता यादीत
२.चौधरी वैष्णवी भानुदास - जिल्हा गुणवत्ता यादीत
सन २०२०-२१
१.वाकचौरे अक्षदा भास्कर – पात्र


एन.एम.एम.एस (NMMS) परीक्षा


इ.८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी या NMMS शिष्यृत्ती परीक्षेचे ज्यादा तास घेऊन मार्गदर्शन केले जाते. यामध्ये विशेष प्राविण्य मिळविणारे विदयार्थी खालील प्रमाणे-
सन २०१५-१६
१.वाकचौरे कांचन कैलास – ६००० शिष्यृत्ती पात्र
२.पवार शंकर प्रकाश – ६०००शिष्यृत्ती पात्र
सन २०१६-१७
१.इरनक सुमित सुरेश – ६००० शिष्यृत्ती पात्र
२. चौधरी अलिशा भारत – ६०००शिष्यृत्ती पात्र
सन २०२०-२१
१.वाकचौरे श्रेयस अजय – पात्र
२. वाकचौरे अक्षदा संजय – पात्र
३. वाकचौरे अक्षदा भास्कर – पात्र
४.गवांदे गायत्री विकास – पात्र
Inspire Award 2018-19
१.भुसारी सिद्धेश गोरक- जिल्हा निवड
उपकरणाचे नाव – Pump rotating On the Bicycle Pad
Inspire Award 2020-21
१.ढगे आदिती गोपीनाथ - जिल्हा निवड
उपकरणाचे नाव - Using muscle power instead of electrical power


एस.एस.सी.परीक्षा
इ. १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तासिकांचे नियोजन केले.यामध्ये विशेष प्राविण्य मिळविणारे विदयार्थी खालील प्रमाणे-
मार्च २०१६-१७
शेकडा निकाल -९४.९४%
१.चौधरी प्रांजली बाजीराव -८८.४०%
मार्च २०१७-१८
शेकडा निकाल -९४.३८%
१.वाकचौरे कांचन कैलास -९४.४०%
मार्च २०१८-१९
शेकडा निकाल -७३.६८%
१.वाकचौरे प्रांजली धनराज -८७.२०%
मार्च २०१९-२०
शेकडा निकाल -९५.७१%
१.गावडे शितल विजय -८६.८०%
मार्च २०२०-२१
शेकडा निकाल -१००%
१.वाकचौरे मुक्ता अमोल -९८.४०%


क्रीडा विभाग

सन २०१६-१७
कुस्ती
१.गिऱ्हे पल्लवी भारत –जिल्हा निवड
सन २०१७-१८
कुस्ती
१.गिऱ्हे पल्लवी भारत – विभागीय निवड
सन २०१९-२०
लांब उडी
१.ठाकरे आचल विठ्ठल – जिल्हा निवड
उंच उडी
१.कातोरे सुप्रिया सचिन – जिल्हा निवड
१०० मीटर धावणे
१.वाकचौरे ओम धनराज – जिल्हा निवड
४x१०० मीटर रिले मुले
१.वाकचौरे ओम धनराज – जिल्हा निवड
२.वाकचौरे सुधीर सतीष – जिल्हा निवड
३.ढगे रसिक दत्तात्रय – जिल्हा निवड
४.चौधरी यशार्थ भारत – जिल्हा निवड


शाळेत उपलब्ध असलेल्या सुविधा

१.शाळेची सुसज्ज इमारत,वर्ग खोल्या.


२.गुणवत्तापूर्वक व उपक्रमशील अनुभवी उच्चशिक्षित शिक्षक वृंद


३. विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक व भावनिक सर्वांगीण विकासाकडे कल


४. शाळेत विविध उपक्रम स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन व नियोजन


५.केंद्र शासनाची अटल टिंकरिंग प्रयोगशाळा


६. डिजीटल शाळेमधून विद्यार्थी घेणार शिक्षण, प्रोजेक्टर, संगणकाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर भर


७.अनेक विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन


८. विविध गुणदर्शन स्पर्धेचे यशस्वी नियोजन


९. सर्वांगीण विकासासाठी संस्कृती स्पर्धा ,रांगोळी चित्रकला, हस्ताक्षर, वकृत्व ,निबंध, वेशभूषा तसेच विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण.


१०. निसर्गरम्य वातावरण, विस्तृत मैदान, हवेशीर वर्गखोल्या, पुरेसे फर्निचर, दिनविशेष तसेच विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे, विशेष उपक्रमांचा सहभाग.




विद्यार्थी मित्रांनो कुठलाही व्यक्ती परिपूर्ण नसते. ज्या व्यक्ती आपल्याला आजच्या जीवनात अतिशय यशस्वी झालेल्या दिसतात, त्यांनी सुरुवातीला अपयश आलेच असते. अशी कोणती गोष्ट त्यांच्याकडे असते की, जी त्यांना यशाकडे घेऊन जाते. ती गोष्ट म्हणजे आपल्या आवडत्या विषयात यशस्वी होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, प्रयत्नातील, सातत्य, सकारात्मक वृत्ती यामुळे त्यांच्याकडे खेचले जाते. त्यासाठी आपले आई-वडील, शिक्षक, कुटुंब व समाजातील ज्येष्ठ व्यक्ती यांचे मार्गदर्शन होणे व त्यांचा आदर सन्मान राखणे देखील महत्त्वाचे आहे. ‘विद्या विनयेन शोभते’ असे म्हणतात, तुमचे ज्ञान हे विनयशील नम्र स्वभावामुळे अधिक खुलून दिसते. प्रत्येकजण कुठल्यातरी एका विषयात अधिक हुशार बुद्धिमान असतो. त्यामुळे आपली आवड कल ओळखा त्यासाठी आपले पालक व गुरुजनांच्या मार्गदर्शन घ्या व जीवनात यशस्वी व्हा.