- KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
- +91 9960609232
अकोले तालुक्यातील गोर-गरीब, आदिवासी, मागास असे समाजातील सर्वच स्थरातील मुलांना शिक्षण मिळावे या व्यापक विचाराने बाबांनी सन १९५८ मध्ये अगस्ति एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आपण ज्या समाजामध्ये वाढलो,खेळलो,शिकलो आणि ज्यांच्या मदतीन स्वतंत्र लढ्यात लढता आल, त्या समाजाच उतराई होता याव म्हणून त्यांनी सन १९६६ मध्ये अकोले आणि ब्राम्हणवाडा या ठिकाणी माध्यमिक विद्यालये सुरु केली. तसेच पुढे देवठाण, सुगाव खु. कळस, पिसेवाडी, वीरगाव आणि टाकळी या ठिकाणी विद्यालये सुरु करून दर्जेदार शिक्षणावर भर दिला.आज संस्थेची ९ माध्यमिक विद्यालये व ३ उच्च माध्यमिक विद्यालये या माध्यमातून ज्ञानबीज पेरण्याचे काम करून राष्ट्र बांधणी करत आहेत. संस्थेच्या प्रत्येक विद्यालयात शिक्षक तळमळीने अध्यापनाचे काम करत आहेत. वर्गातील शेवटच्या बाकावरील विद्यार्थ्यापर्यंत बारकाईने लक्ष देऊन विविध संकल्पना स्पष्ट केल्या जातात. त्यासाठी शिक्षक विविध प्रकारचे उपक्रम वर्गात तसेच चार भिंतींच्या बाहेर सुद्धा राबवत असतात.
विज्ञानातील अनेक प्रयोग प्रत्येक्षपणे प्रयोग शाळेत करून दाखवले जातात तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांला सुद्धा हे विज्ञानातील प्रयोग करण्याची संधी दिली जाते व यातून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे काम केलं जात. प्रत्येक्ष कृतीतून शिक्षण या गोष्टीवर अधिकच भर दिला जातो.
अभ्यासामध्ये मागे असणाऱ्या मुलांसाठी संस्थेने २०१७-१८ सालामध्ये एक महत्वकांक्षी प्रकल्प ‘भाग्यश्री फौंडेशन ठाणे’ यांच्या मदतीने ‘रोजनिशी’ संस्थेच्या सर्व शाखांमध्ये राबविला.या उपचारात्म उपक्रमामुळे अप्रगत मुले प्रगत मुलांच्या बरोबरीने आणली जात आहेत. तसेच मुलांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेच्या प्रत्येक विद्यालयात गणेशोत्सव, शिवजयंती, शिक्षकदिन,सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी अनेक उपक्रम संस्थेच्या मार्गदर्शनाखाली राबविले जातात.
२१ वीसाव्या शतकात आपली मुले कुठेही कमी पडू नयेत व त्यांचे संभाषण कौशल्य अस्लखीत व्हाव यासाठी संस्था विद्यालायान्तर्गत विविध स्पर्धा आयोजित करते. त्यामध्ये भाषण,वादविवाद,मुलाखती तसेच विविध विषयांवर चर्चासत्र भरविते.
समाजातील गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्थापातळी मुलांना गणवेश व वह्या-पुस्तक वाटप केले जाते. मुलांना आवांतर वाचनात आवड निर्माण व्हावी यासाठी समृद्ध ग्रंथालय आणि स्वतंत्र वाचन कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. मुलांमध्ये वकृत्वाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध क्षेत्रातील व्याख्याते आणून अनेक व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात.
लैंगिक समानतेचे शिक्षण यावर विशेष भर देण्यात येतो. व्यवसाय शिक्षण मार्गदशन असे अनेक उपक्रम संस्थापातळीवरून सर्व विद्यालयांत राबविले जातात. कोविड-१९ च्या काळात संस्थेच्या सर्व विद्यालयांत Online शिक्षण प्रणाली सुरु केली. यासाठी ZOOM Online meeting, Google meet, Teachmint live classroom, PPT Presentation, Testmoz, Google Classroom, Google form, Kahoot app and Whatsapp या सारख्या विविध माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले.
शिक्षणाबरोबर संस्थेने आपल्या प्रत्येक विद्यालयात भव्य क्रीडांगणे तयार केलेली आहेत. यातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती,संयम तसेच शारीरिक व मानसिक विकास जोपासण्यासाठी प्रयत्न केला जातो. यात कब्बडी, खो-खो, धावणे, उंच उडी, लांब उडी, Badminton, Netball. पुस्तकातील ज्ञान प्रत्येक्ष अनुभवण्यासाठी संस्था दरवर्षी सहल आयोजन करते. यामध्ये विविध भौगोलिक, ऐतिहासिक, नैसर्गिक तसेच वैज्ञानिक ठिकाणांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रत्येक्ष अनुभूती दिल्या जातात.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणितीय आवड निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी गणित आणि विज्ञान प्रदर्शन भरविले जातात. इंग्रजी विषय प्रयोगशाळा भरविणे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यातून दरवर्षी अनेक विद्यार्थी SCHOLARSHIP EXAM, NMMS EXAM, NTS EXAM, नवोदय परीक्षा, प्रज्ञा शोध परीक्षा पास होतात. दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे संस्थेचे अनेक विद्यार्थी इयत्ता १० वीच्या SSC BOARD परीक्षेत झळकलेले आहेत तसेच अनेक विद्यार्थी ९० % पेक्षा अधिक गुण मिळवून तालुका आणि जिल्ह्यात प्रथम आलेले आहेत.
संस्थेच्या प्रत्येक विद्यालयात अद्ययावत संगणक कक्ष, विज्ञान प्रयोग शाळा आहेत तसेच केंद्रशासनाची ATAL Tinkaring Lab संस्थेच्या ५ विद्यालयांना मिळालेली आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) च्या परीक्षेत पास होऊन श्रीहरिकोटा येथे इस्रो सहल संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. संस्थेचे अनेक विद्यार्थी आज IIM, IIT या आंतरराष्ट्रीय स्थरावर नावाजलेल्या संस्थांमध्ये शिकत आहेत.