• KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
  • +91 9960609232

Sahyadri Secondary and Higher Secondary School Brahmanwada

Phone Whasapp

* सहशालेय उपक्रम *

महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठीच्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून शाळेत महात्मा गांधी व स्वातंत्र्य भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्री यांची जयंती साजरी केली गेली.

२ ऑक्टोबर २०२१ हा दिवस भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस या थोर महात्म्यांच्या जयंतीचा दिवस परंपरेप्रमाणे तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यालयात उत्सहात साजरा करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लाकडाऊन बाबतच्या शासन नियमांचे पालन करीत सर्व शिक्षक, निवडक विद्यार्थी तसेच निमंत्रित पालकांच्या व शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळवन्यासाठी तत्वनिष्ठतेने आणि मूल्याधिष्ठित विचारांनी इंग्रजांशी लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी; तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडात राष्ट्रउभारणीच्या पायाचा दगड बनून राहिलेले स्वतंत्र भारताचे दूसरे पंतप्रधान स्वर्गीय लालबहाद्दूर शास्त्री यांच्या विचारांना उजाळा देत कार्यक्रम संपन्न झाला.




निवडणूक साक्षरता मंच

सह्याद्रि माध्य. व उच्च. माध्य. विद्यालयात इ.९ वी ते इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता ‘ निवडणूक साक्षरता मंच ʼ ( Electoral Literacy Club ) स्थापन करण्यात आला.


निवडणूक साक्षरता मंच्याचे उद्देश

१. निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे.
२. शाळा , कॉलेज मध्ये निवडणूक साक्षरता निर्माण करणे.
३. भविष्यातील मतदारांना माहितीपूर्ण आणि नैतिक निवडणूक सहभागासाठी तयार करणे.
४. भावी मतदार नाव नोंदणी करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे.


या उद्देशांची पूर्ती करण्यासाठी सह्याद्रि माध्य. व उच्च. माध्य. विद्यालयात शनिवार दि. १६.१०.२०२१ रोजी निवडणूक साक्षरता मंच्याची स्थापना करण्यात आली. निवडणूक साक्षरता मंच्याच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जागतिक मतदार दिन ( २५ जानेवारी ) मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. लोकशाही यशस्वी होण्यासाठी निवडणूकांची गरज, निवडणूकांचा इतिहास, भारतातील राजकारण, भारतातील पक्ष पद्धती, आपले हक्क व मतदानाची आवश्यकता या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


* शिवजयंती *

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा, इतिहासाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा विद्यार्थ्यापर्यंत पोहचावाव हिंदवी स्वराज्य स्थापनेचा गौरवशाली इतिहास सर्वदूर पसरावा या उद्देशाने विद्यालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी थाटामाटात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, गीते व पोवाडे गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


विद्यालयाची विद्यार्थीनी कु· तनुजा फापाळे हिने छत्रपती शिवाजी महाराजांची तर कु. आदिती आरोटे हिने माँसाहेब जिजाऊ यांची वेशभुषा साकार केली. अनेक विद्यार्थ्यांनी वेषभुषा करत स्वराज्यातील मावळ्यांची भूमिका साकारली, कुमार यश गायकर, कुमारी भाग्यश्री कासुटे, कुमार तन्मय तळेकर यांनी महाराजांच्या चरित्रावरील पोवाडे सादर केले.


प्रा. अमित सहाणे यांनी विद्यालयास शिवचरितावरील पुस्तकांचा संच भेट दिला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.


सर्व उपक्रमांनंतर छोटेखानी सभेचे आयोजन करुन शिवजयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


ग्रंथालय अहवाल


सह्याद्रि माध्य- उच्च माध्य. विद्यालय ब्राम्हणवाडा
ता. अकोले जि. अहमदनगर
विद्यालयातील ग्रंथालयातील वार्षिक अहवाल


विद्यालयातील ग्रंथालयात एकूण ५२०० पुस्तके आहेत. त्यात शिक्षक ग्रंथालय व विदयार्थी ग्रंथालय असे वर्गीकरण केलेले असून शिक्षक ग्रंथालयासाठी ३१०० व विद्यार्थी ग्रंथालयासाठी २१०० पुस्तके आहेत.


१) शिक्षक ग्रंथालयातील पुस्तकांचे वर्गीकरण संदर्भग्रंथ, व्यक्तीचरित्र, आत्मचरित्र, काव्य, नाटक, ललितग्रंथ, सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक कादंबरी, नियतकालिके उपलब्ध आहेत.
२) विद्यार्थ्यासाठी बालसाहित्य, वकृत्व स्पर्धा, कथाकथन, प्रश्नमंजुषा, थोर व्यक्तीचरित्र उपलब्ध आहेत.
३) विद्यालयातील ग्रंथालय सुसज्ज असून बाल वाचकांसाठी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ग्रंथालयात स्वतंत्र वाचन कक्ष उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यार्थी ऑफ तासाला ग्रंथालयात येवून वाचन कक्षात वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेतात. विद्यालयाचे ग्रंथपाल विद्यार्थी वाचकांना मराठी विश्वकोष शब्दकोष संदर्भग्रंथ कसे बघावेत याचे वेळोवेळी मार्गदर्शन करतात. ग्रंथालयात नियत कालिके वर्तमानपत्रे (कात्रणे) यांचा स्वतंत्र विभाग आहे. तसेच सूचनाफलकावर विद्यार्थ्यांना नविन नविन माहिती उपलब्ध करून दिली जाते. व आठवडा भराचे वेळापत्रक तयार करून विविद्यार्थ्याना पुस्तके उपलब्ध करून दिले जातात.


विद्यालयाचे ग्रंथपाल मुलांना, विद्यार्थांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन मिळते व नवनवीन उपक्रम राबविले जातात. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शासनाच्या परिपत्रकानुसार १०० दिवस वाचन अभियान अंतर्गत उपक्रम राबविले गेले. त्यात विद्यार्थ्यांना आवडलेल्या पुस्तकांचे वाचन केले.


इ. ९ वी ते इ. १२ वी साठी भाषा विषयक कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम


मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुलांमध्ये भाषिक कौशल्य रुजवणे हे खूप महत्वाचे आहे. अनेक विषयांमध्ये नवनवीन शोध लागले आहे. असे की विज्ञान, आरोग्य, पर्यावरण परंतू भाषेमध्ये अनेक अडचणी दिसून येतात. व्यक्तीमत्व विकासासाठी भाषा ही खूप महत्वाची असते. त्याच बरोबर मुलांचे संगोपन, शिस्त किंवा कृतींना प्रोत्साहन असो या सर्व बाबतीत भाषा ही अतिशय महत्वाची असते. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, शिक्षकांचे प्रशिक्षण असेल किंवा अध्यापन पध्दती असेल यामध्ये भाषेचे महत्व अनन्य साधारण असे आहे.


“भाषा, हे एक संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे”. अशी सर्वसाधारण भाषेची व्याख्या केली गेली आहे. परंतु भाषा ही बहुउपयोगी आहे. जसे की विद्यार्थी भाषेच्या माध्यमातून विचार करू शकतो, संवेदना जाणतो, प्रतिसाद देतो, जगाकडे बघण्याची दृष्टी त्याला भाषेच्या माध्यमातूनच मिळते. विद्यार्थी भाषा हि प्राथमिक शाळेपासूनच शिकत आला आहे, जसे की बोलणे, वाचणे, लिहीणे, ऐकणे. परंतु या आणि इतर माध्यमातून सहयाद्रि माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात “भाषा विषय” गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम मागील काही वर्षांपासून राबविण्यात आलेले आहेत. भाषेचा संबंध कृतीशी येतो म्हणून या विद्यालयात भाषेचे शिक्षक, कृतीयुक्त अध्यापन पद्धती शिकविताना वापरतात.


विद्यालयात मुलांमध्ये भाषिक कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात.


१) विद्यार्थ्यांना शब्द अनुभव देणे.
२) भाषेचा संबंध कृतीशी जोडणे.
३) विविध शाळेतील अथवा शाळेबाहेरील विविध विषयांवर बोलण्यास प्रवृत्त करणे.
४) विद्यार्थ्यांना बोलण्यास स्वातंत्र्य देणे.
५) स्वमत व्यक्त करण्यास स्वातंत्र्य देणे.
६) मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.
७) स्वतःच्या कृतींना दिशा देणे.
८) निबंध स्पर्धा आयोजीत करणे.
९) वकृत्व स्पर्धा आयोजित करणे.
१०) निरीक्षणातून मुले भाषा शिकतात म्हणून सहलीचे आयोजन करणे.
११) वर्गात विद्यार्थ्याचे वाचन घेणे.
१२) ग्रंथालयात विविध पुस्तकांचे वाचन करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
१३) विविध वस्तूंचे निरीक्षण करून बोलण्यास प्रोत्साहन देणे.


*विद्यालयात भाषा विषय गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात *


१) भाषा विषय कृती पत्रिकेची रचना समजावून सांगणे.
२) मागील वर्षाच्या कृती पत्रीकेंचा सराव करून घेणे.
३) विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे.
४) वर्गामध्ये वाचनाचा भरपूर सराव
५) लिहिण्याचा सराव
६) आठवड्यातून एकदा ग्रंथालयात वाचन.
७) प्रत्येक गद्य व पद्य यावर कृती तयार करुन सोडवून घेणे.
८) विद्यार्थ्यांना वर्गात प्रश्न विचारून बोलण्यास प्रवृत्त करणे.
९) शब्द संग्रह वाढीसाठी प्रयत्न.
१०) स्वमत व्यक्त करण्यास प्रोत्साहन देणे.
११) कवितेचे रसग्रहण, यमक योजना, यमक जुळणारे शब्द, भाषेचे अलंकार यांचा सराव
१२) निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, यांचे आयोजन
१३) महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी साजऱ्या करून तज्ञ शिक्षकांचे भाषण ऐकवणे.
१४) भरपूर सराव परीक्षा.


स्पर्धा परीक्षा


सह्याद्रि माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवाडा, ता. अकोले, जि. अहमदनगर या विद्यालयात दरवर्षीप्रमाणे स्पर्धा परीक्षा विभाग कार्यरत असतो. विद्यालयात नियमितपणे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना दररोज अतिरिक्त स्पर्धा परीक्षेसंबंधी विषयाप्रमाणे मार्गदर्शन करतात. याची प्रचीती म्हणजे यावर्षी सन २०२०-२१ मध्ये गुणवंत विद्यार्थी कुमार अथर्व रंगनाथ भांडकोळी याची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर जिल्हा अहमदनगर येथे सहावी प्रवेशासाठी निवड झाली. आणि सार्थ अभिमान वाटतो की, याच विद्यार्थ्याची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी २१०/३०० गुण मिळवून निवड झाली. त्याचप्रमाणे पूर्व माध्य. शिष्यवृत्तीसाठी कुमारी अनुष्का शशिकांत दावभट हिची २३४/३०० गुण मिळवून निवड झाली.


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी (N.M.M.S.) ही केंद्र शासन पुरस्कृत योजना असून महाराष्ट्र राज्यातील खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता ८ वी. मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. यात विद्यालयातील दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या आहेत.


१) कुमारी बांगर दिक्षा अमोल
२) कुमारी कडू साक्षी दत्तात्तय


सन २०२१-२२ मध्ये इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती साठी ४१ विद्यार्थी, इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती साठी २६ विद्यार्थी, एन. एम. एम. एस. परीक्षेसाठी १४ विद्यार्थी, एन. टी. एस. परीक्षा १५ विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन नियमितपणे चालू आहे.


* इ. १० वी. १२ वी. च्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ *


एच. एस्. सी. व एस. एस. सी. बोर्ड परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी विद्यालयातर्फे ज्ञानरूपी शिदोरी बरोबर औपचारिक निरोप व परीक्षेसाठी सदिच्छा समारभाचे आयोजन केले जाते. याही वर्षी माजी प्रशासकीय अधिकारी मा. तान्हाजी पानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता १२ वी. च्या विद्यार्थ्यांच्या निरोप व सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले. व इयत्ता १० वी. च्या विद्यार्थ्यांना ब्राह्मणवाडा गावचे पोलीस पाटील श्री. शिवाजीराव हांडे यांनी मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी सदिच्छा दिल्या.


आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात मा. श्री. पावडे साहेब व श्री. शिवाजीराव हांडे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. "बोर्डाची परीक्षा हे एक पाऊल आहे. जीवनात अशा अनेक परीक्षांना आपल्याला पावलोपावली सामोरे जायचे आहे. येऊ घातलेली परीक्षा जीवनाच्या कासोटयांचे लघु रूप आहे. म्हणून उद्याच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. जीवनातील अनेक वाटा तुमची आतुरतेने वाट पाहत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. डोळसपणे त्यांचा अभ्यास करा आणि प्राप्त करा.


तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती आपले ऋण व्यक्त केले.


* ७३ वा प्रजासत्ताक दिन *


भारतीय स्वातंत्र्य व लोकशाही मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर व्हावेत यासाठी सर्व शाळांमधून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी विद्यालयात ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच मा. सुभाष गायकर समवेत सरपंच संतोष भांगरे तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे ध्वजारोहन विद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते संपन्न झाले. उपसरपंच मा. सुभाष गायकर यांनी " भारतीय प्रजासत्ताक हे स्वातंत्रवीरांच्या बलिदानाचे व स्वातंत्र्योत्तर काळात समाजसुधारकांनी केलेल्या त्यागाचे मूर्तिमंत रूप आहे. समाज उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी त्याग केला त्या प्रत्येक घटका प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आजच्या संदर्भात कोविड १९ च्या काळातील डॉक्टर, पोलिस व इतर आघाडीच्या लढवय्या शिलेदारांचे ऋण कधीही न फिरणारे आहे”. अशी कृतशतेची भावना व्यक्त केली. तत्पूर्वी भारतीय राज्यघटनेच्या उददेश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. शाळेचे तसेच परिसरातील जि. प. प्रा. शाळेच्या निवडक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा दिल्या.


* कला *


शिक्षणाचा मूळ उद्देश विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास साधने हाच आहे.


इतर विषयाप्रमाणे कला हा विषय सुद्धा विद्यार्थ्यांना शिकविला जातो. अतिउत्कृष्ट हिरा जसा अनेक पैलूंनी घडलेला असतो, तसेच कला हा विषय अनेक पैलूंनी नटलेला आहे. साधारणपाणे शिक्षणात चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन हे सहा प्रकार आहेत. विद्यार्थ्याची आवड, वृत्ती कल ओळखून त्या पदधतीने त्याला मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले जाते.


त्या 'साठी वर्गकामात तशा पध्दतीचे प्रात्यक्षिक घेतले जातात, विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते, शासकिय चित्रकला परीक्षा घेतल्या जातात. अशा माध्यमातून विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कौशल्याचा विकास साधला जातो.


कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती स्मरणशक्ती आणि सृजनशक्तीला चालना देणारा प्रात्यक्षिक विषय म्हणजे कला आहे. म्हणूनच विद्यालयात गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा बाबा यांच्या जयंती निमित २८ जून रोजी दरवर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी होतात.


तसेच गणेशोत्सवात रांगोळी स्पर्धेचे नियोजन केले जाते. शिवजयंती उत्सवात टिपरी नृत्य लेझिम नृत्य, झांज नृत्य सादर केले जातात. ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी अपंग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन पंचायत समिती अकोले यांनी केले. त्यात चित्रकला, गायन, निबंध स्पर्धे मध्ये विद्यालयातील अपंग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून बक्षिसे संपादन केली. सन २०१९ मध्ये शालेल्या शासकिय चित्रकला स्पर्धेत ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन २३ विद्यार्थी सी. ग्रेड तर १० विद्यार्थी बी. ग्रेड मध्येउत्तीर्ण झाले.


विद्यार्थ्यांना व्यक्त होन्यासाठी भाषा विषयाप्रमाणे प्रमाणे कला जागतिक माध्यम आहे. म्हणूनच दरवर्षी विविध “गुणदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात केले जाते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यास प्रवृत्त करून त्यांच्या सुप्त कलागुलांना वाव दिला जातो.


प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्याला आपली आवड कल निवडतांना अधिक सुकर होते. व आपले जीवन समृद्ध करणासाठी सुजाण नागरिक बनण्यासाठी शाळेतील कला विषय अतिशय महत्त्वाचा आहे ठरतो.