• KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
  • +91 9960609232

Agasti Sec and Higher Secondary School Akole

Phone Whasapp

शिक्षण म्हणजे नक्की काय?

महात्मा गांधीजींच्या मते, जे शिक्षण चारित्र्य घडवते तयार शिक्षण म्हणतात. विद्यार्थी जीवनात चारित्र्याला योग्य आकार मिळवा एक चारित्र्यवान पिढी निर्माण व्हावी या व्यापक विचाराने थोर स्वातंत्र सेनानी गुरूवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा बाबा यांनी 19 जून 1966 रोजी अगस्ति विद्यालय अकोले या विद्यालयाची स्थापना केली.

विद्यालयाच्या स्थापनेपासून आजतागायत अनेक सहशालेय उपक्रम. शैक्षणिक उपक्रम विद्यालयात राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खेळ,स्पर्धा परीक्षांचे आयोजन विद्यालयात करण्यात येते. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ व्हावा, विकसित व्हावा यासाठी शाळेत विज्ञान प्रदर्शन, गणित प्रदर्शन भरविले जातात. विद्यार्थ्यांना योग्य शिस्त लागावी यासाठी MCC हा उपक्रम सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांंना प्रत्येक नैसर्गीक ऐतिहासिक वैज्ञानिक अशा विविध स्थळांना भेटी देऊन वास्तववादी जगाचे दर्शन घडविण्याचे काम विद्यालय करते.


विद्यालयात विद्यार्थ्यांना फक्त गुण मिळविण्याच्या स्पर्धेत तयार केले जात नाही तर त्यांना प्रौढ जीवनाची तयारी आणि येणार्‍या आव्हानास सुद्धा शिकवण दिली जाते. यासाठी विद्यालयात विविध उपक्रम घेतले जातात.


वृक्षारोपन या उपक्रमातून मुलांना आपण ज्या पर्यावरणात राहतो त्याबाबत सजग आणि जागरूक केले जाते. वृक्षाप्रमाने आपण सुद्धा दाता बनणे गरजेचे आहे हा बोध त्यांना शिकविला जातो.



थोरांच्या जयंत्या इतिहासातील अनेकांच्या जयंत्या साजऱ्या करून देशभक्ती थोर विचारांची शिदोरी मुलांच्या आयुष्याला बांधुन दिली जाते


लैंगीक शिक्षण या शिक्षण प्रणालीतुन मुलांमधे मुलगा - मुलगी एक समान या विचारांची प्रेरणा विद्यालयात केली जाते.


समुपदेशन कार्यशाळा - विद्यार्थी पालक शिक्षक या त्रिशंकूला एकत्रित करून वेळोवेळी समुपदेशणाचे धडे दिले जातात आणि तिघा मध्ये एक घट्ट नात बनविण्याचे काम विद्यालयात वेळोवेळी केले जाते

व्याख्यानमाला - विद्यालयात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन व्याख्यानमालेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धडे दिले जातात.

शिवउत्सव - विद्यालयात शिवउत्सव साजरा करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्यामधे उठविण्याचे काम केले जाते.

गणेशोत्सव- श्री गणेशोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्याचे काम विद्यालय करत असत. त्यामधे रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा इ. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ व्हावा यासाठी विद्यालयात दरवर्षी विज्ञान - गणित प्रदर्शन भरविले जाते. यामधे विज्ञान शिक्षकांच्या मदतीने अनेक विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमासह सहभाग नोंदवतात. याचाच परिणाम म्हणुन विद्यालयातील अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्यपातळीवर पोहोचले आहेत.


वाचन आराखडा - विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन आठवडा उपक्रम विद्यालयात अनेक दिवसांपासून सुरू आहे. यातून वाचन संस्कृती मुलांमधे रुजविण्याचे काम विद्यालय करते.


लेखन क्षमता - विद्यार्थ्यांमध्ये लेखन क्षमता विकसित करण्यासाठी विद्यालय विविध विषयांवर लेखन स्पर्धा आयोजित करत असते. यामधे निबंध स्पर्धा, भाषण लेखन स्पर्धा, जाहिरात बनविणे, कोडे बनविणे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा इ. अनेक स्पर्धा भरविल्या जातात.


वक्तृत्व स्पर्धा - 21 व्या शतकातील विद्यार्थी घडविण्यासाठी त्याच्याकडे बोलण्याचे कौशल्य असावे यासाठी भाषण स्पर्धा, मुलखात, परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा सेमिनार इ. अनेक कार्यक्रमांचे आयोजन विद्यालय करते.


अटल लॅब, संगणक लॅब - विद्यार्थ्यांना प्रत्येक कृतीतून शिक्षण देण्यासाठी आणि या लॅब मधील प्रत्येक वस्तू हाताळता यावी यासाठी प्रत्यक्ष कृतीतून प्रि इंजिनिअरिंग प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. आज विद्यार्थी 3D प्रिंटर च्या सहाय्याने अनेक वस्तू तयार करण्याचे काम प्रत्यक्षपणे करतात. तसेच त्यांना संगणक सादर करण्याचे काम विद्यालय करत आहे.


स्पर्धापरीक्षा - शैक्षणिक गुणवत्तेत विद्यार्थी कुठेही कमी पडू नये किंवा मागे राहू नये यासाठी विविध स्पर्धा परीक्षा विद्यालयात आयोजित केल्या जातात. त्यामधे स्कॉलरशिप परीक्षा, NTS Exam,, NMMS Exam, नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षा अशा अनेक स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. याबाबत विद्यालय नेहमी परिपूर्ण मार्गदर्शन करून उत्तुंग यशाची परंपरा राखत आहे.


खेळ - विद्यार्थी जीवनात अभ्यासाबरोबर खेळ सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो म्हणुन विद्यालयाच्या सुंदर, स्वच्छ मैदानावर मूल Indoor आणि Outdoor खेळांचा सराव करत असतात. त्यामुळे विद्यालयातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत.


ग्रंथालय - विद्यालयाच्या ग्रंथालयात अनेक पुस्तके असून विद्यार्थी विविध पुस्तके वाचनाचा आनंद घेत असतात. याचाच परिणाम विद्यालयातील एका विद्यार्थिनीस अखिल भारतीय साहित्य संमेलनात सर्वात जास्त पुस्तके वाचण्यासाठी पारितोषिक देण्यात आले.


एक परिपूर्ण सर्वांगीण, सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यालय नेहमी कार्यमग्न असते. त्यासाठी संस्था व्यवस्थापन मंडळ नेहमी सजग राहून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या भौतीकसुविधा पुरविण्याचे काम करत असते.


मुख्याध्यापक
अगस्ति विद्यालय अकोले