• KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
  • +91 9960609232

Takaleshwar Vidyalaya Takli

Phone Whasapp

टाकळेश्वर विद्यालय, टाकळी

श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित.... श्री अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व निसर्गाच्या कुशीत असलेल्या टाकळेश्वर विद्यालय टाकळी या विद्यालयाची स्थापना 1993 साली झाली अनंत अडचणीवर मात करत ज्ञानदान करण्यासाठी उपक्रमशील तथा गुणवत्ताधारक शिक्षक शिक्षकांच्या सहकार्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरता विद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष श्री शिरीष नाईकवाडी सर, सतीषजी नाईकवाडी,संदीप नाईकवाडी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून ‘तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विद्यालय यशस्वी वाटचाल करत आहे.


‘हर्बर्ट स्पेंसर म्हणतात की मनुष्याचे शील बनविणे म्हणजे शिक्षण’ ज्यांचे तत्वज्ञान व्यावहारिक जीवनापूरते मर्यादित असते सर्वांगसुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजेच शिक्षण विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यपद्धती राबवतात विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर उपयोजित शिक्षणावरही भर दिला जातो.


पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त विद्यालयात नवागतांचे स्वागत वाचन लेखन उपक्रम, विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरा करणे, शालेय परिपाठ, वृक्षारोपण, वकृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, सामाजिक बांधिलकी म्हणून स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, वृक्षदिंडी, क्षेत्रभेट शैक्षणिक सहल यासारखे शालेय उपक्रम विद्यालयात घेतले


मुलांच्या शिक्षणाबरोबर शारीरिक आणि बौद्धिक, भावनिक विकास व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.