- KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
- +91 9960609232
श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी चे श्री.संत साईबाबा विद्यालय पिसेवाडी (मन्याळे) या विद्यालयाची स्थापना आदिवासी दुर्गम भागात दिनांक 13 जून 1999 ला स्थापना झाली असून जून 1999 पासून विद्यालय मान्यता प्राप्त झाले. संस्थेचे, संस्थापक,सेक्रेटरी आदरणीय गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा (बाबा) यांनी समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी अकोले तालुक्यात एकूण 9 विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातच अतिशय दुर्गम भाग व सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पिसेवाडी या गावात 13 जून 1999 ला विद्यालय स्थापन करण्यात आले.
१) निसर्ग रम्य वातावरणात सुसज्ज शालेय इमारत व परिसर.
२) नाविन्यपूर्ण उपक्रम:- विद्यालयात वृक्षारोपण गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव, विविध नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी यांचे आयोजन व विज्ञान गणित प्रदर्शन वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, किशोर वयीन मुला-मुलीन करीता मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, ग्रामस्वच्छता अभियान, मतदार प्रबोधन, वृक्षलागवड इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले जाते.
३) संस्थेचे संस्थापक, सेक्रेटरी आदरणीय गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर (बाबा) यांची जयंती 28 जून व 29 डिसेंबर पुण्यतिथी निमित्त यांच्या जीवन पटावर आधारित वकृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा विद्यालयातील प्रथम क्रमांकाची तालुकास्तरीय निवड सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र दिले जाते.
४) एस.एस.सी परीक्षा मार्च 2013 चा शंभर टक्के निकाल ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला.
* एस.एस.सी परीक्षा मार्च 2016 चा शंभर टक्के निकाल व मन्याळे गावचे सुप्रसिद्ध जादूगर श्री. पी .बी हांडे व परिवार यांच्या हस्ते प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो.
५) एस.एस.सी परीक्षा विद्यालयात सलग तीन वेळा शंभर टक्के निकाल विद्यालयात दरवर्षी जागतिक महिला दिन विज्ञान दिन वसुंधरा दिन योग उपक्रमाचे आयोजन केले जाते.
६) क्षेत्रभेटी च्या निमित्ताने दरवर्षी विद्यालयात सहलीचे आयोजन प्रकल्प भेट , वनभोजन, वनदिंडी. इत्यादी कार्यक्रम आयोजन केले जाते.
७) शाळा सुविधा विद्यालयात सुसज्ज वाचनालय ग्रंथालय व प्रयोग शाळा
८) विविध स्पर्धा- विद्यालयात तालुकास्तरीय गणित विज्ञान स्पर्धेत सहभाग विभागीय स्तरा पर्यंत सहभाग इन्स्पायर अवार्ड विद्यार्थी सहभाग विद्यालयात दरवर्षी कबड्डी,खो-खो, धावणे, संगीत खुर्ची ,लांब उडी ,उंच उडी इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते.
*इ.8 वी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जादा तास / सराव यांचे आयोजन.
दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तावाढीसाठी वर्षभर जादा तासाचे आयोजन विविध मार्गदर्शन शिक्षकांचे मार्गदर्शन केले जाते
* विद्यालयात वेळोवेळी माता पालक शिक्षक पालक व शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षण समिती, या सभेचे आयोजन.
९) खेळाचे मैदान विद्यालयाचे एकूण गट क्रमांक 40 / 15 क्षेत्रफळ 70 आर 7000 चौ.मी
* बांधकाम केलेल्या जागेची क्षेत्रफळ 329.40 चौं.मी
*विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोकळी जागा क्षेत्रफळ 6670.60 चौं.मी
*विद्यालयाचे बांधकाम मुख्याध्यापक कार्यालय 2) स्टाफ रूम 3) तीन वर्ग खोल्या 4) एक प्रयोगशाळा असे बांधकाम आहे.
1) मुख्याध्यापक कार्यालय = 10 x 22
2) स्टाफ रूम =15 x 22
3) तीन वर्ग खोल्या = 20x22
4) एक प्रयोगशाळा = 20x25
* विद्यालयाच्या परिसरात मुला मुलींचे साठी स्वतंत्र प्रसाधनगृह व अपंग (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी रॅम्प व विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे