- KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
- +91 9960609232
श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित वटवृक्षाच्या नऊ शाखा मधील स्वामी विवेकानंद विद्यालय वीरगाव,ता-अकोले,जि-अहमदनगर आहे.१९९३ साली सुरु झालेल्या ह्या विद्यालयाची मुख्याध्यापक पदाची धुरा २०१६ पासून सांभाळत असताना संस्थेचे संस्थापक स्वर्गीय बा.ह.नाईकवाडी यांचा आशीर्वाद,सेक्रेटरी आदरणीय दुर्गाबाई नाईकवाडी तथा आई ,अध्यक्षा श्रीमती शैलेजा पोखरकर,कार्याध्यक्ष श्री शिरीष नाईकवाडी सर,श्री सतीश नाईकवाडी,संदीप नाईकवाडी सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.
संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनातून “समाजातील सर्व विद्यार्थांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मूल्यवर्धित शिक्षण देणे” हे ध्येय समोर ठेवून विद्यालयाची वाटचाल यशाकडे होत आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षणाची व्याख्या करताना म्हणतात केवळ डोक्यात माहिती भरणे म्हणजे शिक्षण नाही तर मानवामध्ये दैवी विचारांचे प्रकटीकरण करणे होय.माणसाला मानव बनविणे व त्यात दैवी गुण भरणे असे उपयोजन शिक्षणात असावे म्हणून समाजातील प्रत्येक मुलाने विद्यालयात यावं त्याने चांगल शिकाव हे आमचे एकमेव मिशन आहे.त्यासाठी आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कामाचे उत्तम नियोजन करतात,वेळोवेळी आपल्या कार्याचे मूल्यमापन करतात आणि गरजेनुसार कार्यपद्धतीबदल करून कार्यसफलतेचा आनंद घेतात, ‘कामातून आनंद आणि आंनदाने काम’ हा आमचा मुल मंत्र आहे हा मूलमंत्र शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठीहातभार लावत आहे.
शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शिक्षक आणि पालकांतील सुसंवाद विद्यार्थांच्या शिक्षणाप्रती उत्तरदायित्व वाढवतो म्हणूनच पालक संघ,माता-पालक संघ,शालेय व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत शिक्षक आणि पालक एकमेकांच्या सहकार्याने शालेय विकास आरखडा तयार करून गुणवत्तापूर्ण शिक्षण आमच्या विद्यालयातून दिले जाते.
स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही म्हणूनच,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत राबवली जाणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) यामध्ये विद्यार्थांचा सक्रीय सहभाग नोंदवला जातो. केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी २००७ -०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थांसाठी सदरची परीक्षा इ.८ वी साठी सुरु केलेली आहे.सदर परीक्षेसाठी विद्यार्थांचा सहभाग नोंदवला जातो.इयत्ता १० वीच्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य करावे यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसीत व्हावी आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी यासाठी इयत्ता १० वी च्या विद्यार्थांचा NTS परीक्षेसाठी सहभागी करून परीक्षेचे महत्व सांगितले जाते.स्पर्धा परीक्षेसाठी विद्यालयाचे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पात्र होत आहेत ही विद्यालयाची अभिमानस्पद बाबा आहे.स्पर्धा परीक्षेसाठी नियमित मार्गदर्शन ,इतर विद्यालयातील तज्ञ शिक्षकांचे विद्यार्थांसाठी मार्गदर्शन वेळोवेळी घेतले जाते.नियमित स्पर्धा परीक्षांचा सराव विद्यार्थांकडून करून घेतला जातो.
केवळ पुस्तकी ज्ञान देणे म्हणजे शिक्षण होत नाही तर महात्मा गांधीजींच्या विचाराप्रमाणे ‘शिक्षण म्हणजे बालकाच्या शरीर,मन आत्मा यांचा सर्वागीण विकास घडवून आणणे होय.याचाच अर्थ विद्यार्थांचा सर्वागीन साधने म्हणजे शिक्षण होय.आणि सर्वागीण विकास केवळ पाठ्यपुस्तकात पूर्ण होण्यास काही मर्यादा प्राप्त होतात.या मर्यादा सह शालेय उपक्रमातून पूर्ण करणे शक्य होऊ शकते.म्हणून विद्यालयात प्रवेशोत्सव,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,वाढदिवस साजरा करणे ,मराठी,हिंदी,इंग्रजी परिपाठ,वृक्षारोपण,प्रश्न मंजुषा विविध जयंती व पुण्यतिथी,संविधान वाचन दिन,वाचन प्रेरणा दिन,वाद विवाद स्पर्धा,शैक्षणिक सहल,क्षेत्र भेट,सांस्कृतिक कार्यक्रम,गाव स्वच्छता अभियान यांसारखे विविध सह शालेय उपक्रम नियमित विद्यालयात घेतले जातात. सह शालेय उपक्रमामुळे शाळेतील गळती रोखण्यास मदत झाली.
आम्ही मुलांचा केवळ स्मरणाचा नव्हे तर आकलन,उपयोजन,विचारशीलता ,सर्जनशीलता,कल्पकता अशा क्षमतांचा परिपूर्ण विकास व्हावा,बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्या शारीरिक कौशल्यांचा विकास आणि भावनिक अगांचा परिपोष व्हावा हे व्यापक उदिष्ट ठेवून दर्जेदार शिक्षण देण्याची हमी देत आहोत,त्यासाठी आमच्या विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ‘नित्य नवा दिस जागृतीचा’या नुसार दरदिवशी विद्यालय विकासाचे चित्र अधिका अधिक आकर्षक करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेआणि आनंद ही आहे.
धन्यवाद !
श्री ढगे सुदशशन हेमंत
मुख्याध्यापक