- KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
- +91 9960609232
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत निऱ्हाळा डोंगराच्या पायथ्याशी पूर्वेस वसलेले पिंपळगाव निपाणी हे गाव.
गाव तसं छोट पण जगदंबा माता तथा संटूआईच्या पावनस्पर्शाने पावन झालेल्या गावामध्ये लावलेल छोटसं........ म्हणजे ‘माध्यमिक विद्यालय पिंपळगाव निपाणी’ ता.अकोले
१३ जून १९९५ मध्ये या विद्यालयाची सुरवात झाली. प्रथम ८ वी चा वर्ग नंतर ९ वी व १० वी चा वर्ग अशी ८ वी ते १० वी इयत्तांची छोटीशी शाळा.
‘इवलेसे रोप लावियले दारी’
‘त्याचा वेलू गेला गगनावरी’
याप्रमाणे विद्यालयाचा आलेख नेहमी उंचावत आहे. विशेष बाब म्हणजे ह्या विद्यालयामध्ये मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. या विद्यालयात बहुजन ,गोर गरीब, कष्टकरी जनतेच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. ह्या विद्यालयाने समाजाच्या जडण घडणी मध्ये मोलाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आहे.
१. २९ जून या दिवशी थोर स्वतंत्र सेनानी गुरुवर्य ब.ह. नाईकवाडी सर तथा बाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो.
२. गणेशउत्सवात श्रीं ची स्थापना करून ढोलताशांच्या गजरात निरोप देत उत्सव साजरा केला जातो.
३. छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रोजी विद्यालयात वकृत्व स्पर्धा तसेच महाराजांचे गौरवगीते, पोवाडा, यासारखे कार्यक्रम राबवून भव्य मिरवणूक काढली जाते.
४. ग्रामदैवत जगदंबा माता (संटूआई) उत्सव वैशाख पोर्णिमेला विद्यालयाच्या सहकार्याने यात्रा उत्सव साजरा केला जातो.
५. सावित्रीबाई फुले जयंती ३ जानेवारी या दिवशी स्मार्ट गर्ल ( महिला स्वरक्षण) संबधी विद्यार्थिनिंना मार्गदर्शन करून जयंती साजरी केली जाते.
६. महिला दिन – ८ मार्च या दिवशी शाळेत महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा केला जातो.
७. सहल – दरवर्षी विद्यालयाची शैक्षणिक सहल गुजरात , कोकण, मराठवाडा अशा विविध प्रांतात सहलीचे आयोजन केले जाते.
८. वनभोजन – श्रावण महिन्यात क्षेत्रभेट निऱ्हाळा डोंगर, सुपारा डोंगर, पाचपट्टा किल्ला, हरीश्चंद्रगड अशा विविध ठिकाणी वनभोजन आयोजित केले जाते.
९. वृक्षारोपण – सामाजिक बांधिलकी तथा निसर्गाशी नाते हे मूल्य रुजवण्यासाठी वृक्षारोपण केले जाते.
१०. तज्ञ मार्गदर्शन – संस्था अंतर्गत इतर विद्यालयातील तज्ञ विषय शिक्षक यांचे नियोजन करून मार्गदर्शन केले जाते.
११. विविध गुणदर्शन – प्रजासत्ताक दिन, स्वतंत्रदिन, नवरात्र उत्सव, स्नेह समेंलन मध्ये समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, समूह गायन, नाटिका देश , भक्ती गीत आदि कार्यक्रमांचा समावेश केला जातो.
१२. स्पर्धा परीक्षा –
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इ. ८ वी विद्यार्थ्यांसाठी संस्था नियोजनानुसार शाळेचा प्रारंभ म्हणजे माहे जून पासून जादा तासिकेचे नियोजन करून मार्गदर्शन केले जाते. या मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे..
पात्र विद्यार्थी :
सन २०१८- १९ : १.वाकचौरे अनुज भाऊसाहेब
२.दळवी सृष्टी दिलीप
३.वाकचौरे पियुष भाऊसाहेब
सन २०२०-२१ : कोठवळ तेजस विठ्ठल
इन्स्पायर अवार्ड –
पवार शुभम धोंडिभाऊ २०१४ /१५
उपक्रम : automatic street light
s.s.c. परीक्षा –
सन २०१६ / १७
शाळेचा निकाल : ९० %
प्रथम विद्यार्थी : चौधरी अक्षदा बाळासाहेब ( ८१.८० %)
सन २०१७ / १८
शाळेचा निकाल : ८४ %
प्रथम विद्यार्थी : महाले योगेश दत्तात्रय ( ९३.४० % )
सन २०१८ / १९
शाळेचा निकाल : ८० %
प्रथम विद्यार्थी : लांडगे पल्लवी हौशीराम ( ८६.४० %)
सन २०१९ / २०
शाळेचा निकाल : १०० %
प्रथम विद्यार्थी : गोर्डे पायल राजाराम ( ९१.०० %)
सन २०२० / २१
शाळेचा निकाल : १०० %
प्रथम विद्यार्थी : गोर्डे तनुजा अर्जुन ( ९५.४० %)
इस्रो सहल – डॉ.सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक परीक्षेत प्राविण्य मिळवून इस्रो येथे विमान सहलीसाठी पात्र विद्यार्थी सन २०१८/१९
१.वाकचौरे उमेश गोकुळ
२.तोरमल पियुष भाऊसाहेब
३.आंबरे राहुल भाऊसाहेब
४.वाकचौरे स्नेहल संदीप
५.दळवी सृष्टी दिलीप
१. अभिषेक विलास वाकचौरे ( गणित )
गणितीय क्रिया
२. सुदर्शन विठ्ठल वाकचौरे ( गणित )
पायथागोरसचे त्रिकुट
१. शाळेची सुसज्ज इमारत व सुंदर परिसर.
२. उपक्रमशील व अनुभवी शिक्षक वृंद
३. शाळांतर्गत विविध उपक्रम
४. विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन
५. विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजन
६. रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
७. गणित विज्ञान प्रदर्शन मार्गदर्शन व सहभाग
८. दरवर्षी इ.१० च्या विद्यार्थ्याचा शुबेच्छा समारंभ