- KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
- +91 9960609232
थोर स्वातंत्र्य सेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा बाबा यांनी अहमदनगर जिल्हातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या अकोले तालुक्यातील आदिवासी व बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी ‘श्री अगस्तिएज्युकेशन सोसायटी मुंबई’ या नावाने सन १९५८ मध्ये एक शैक्षणिक संस्था स्थापन केली.
अकोले तालुक्याची भूमी हि श्री अगस्ति ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली असल्याकारणाने या संस्थेला सुद्धा या महान ऋषींच्या नावानेच संबोधित केले आहे.
श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीने खालील उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊनच शैक्षणिक कार्याला सुरुवात केली:
1. समाजातील सर्वस्तरातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती रुजविणे.
2. आदिवासीवमागास वर्गातील गरीब होतकरू मुलांना मोफत शिक्षण देणे.
3. सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यामापानाद्वारे मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे.
4. आरोग्यदायी व स्वावलंबी बनण्यावर भर देणे.
5. सर्व स्तरातील मुलांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्यावर भर देणे.
6. मुलांमध्ये भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजविणे.
7. मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर भर देणे.
8. मुलांमध्ये चिकित्सक व संशोधन वृत्ती निर्माण करणे.
9. आधुनिकआणि दर्जेदार शिक्षणावर भर देणे.
10. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
11. उपक्रमशील शिक्षणावर भर देणे.
12. मुलांच्या सर्वांगीण विकासाबरोबर त्यांच्या कला व क्रीडा गुणांना चालना देणे.
13. मुलांमध्ये नेतृत्व गुण विकसित करून आदर्श नागरिक निर्माण करणे.