- KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
- +91 9960609232
सन१९५८साली श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली तद् नंतर थोर स्वातंत्र सेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा बाबा यांनी सन २ जून १९६६ रोजी ब्राम्हणवाडा येथे सह्याद्री विद्यालय आणि त्यानंतर १९ जून १९६६ रोजी अकोले येथे अगस्ति विद्यालय अकोले या दोन विद्यालयांची स्थापना करून बाबांनी या दुर्गम भागातील समाजातील सर्व मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. संस्था स्थापनेपासून संस्थेने जी शैक्षणिकउद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन स्थापना केली होती ती सर्व उद्दिष्टे यशस्वीपणे पूर्ण करत असून त्याबाबत संस्था गरुड झेप घेत आहे याचाच परिपाक म्हणून सांगण्यातआनंद होत आहे कि संस्थेत शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज देश-विदेशात विविध मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे आज संस्थेची एकूण ८ विद्यालये आणि ३ उच्च माध्यमिक विद्यालये कार्यरत आहेत. या सर्व शाखांमध्ये ५ हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
आज शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत.शिक्षणाच्याकक्षा रुंदावत आहेत. विविधशैक्षणिक, व्यावसायिक कोर्सेस सुरु होत आहेत त्यामुळे विद्यार्थांचे हित लक्षात घेऊन या बदलांबरोबरच संस्थेने देखील आपल्यापुढील ध्येय धोरणांमध्ये बदल करून नवीन ध्येयधोरण आखलेली आहेत.
संस्थेची पुढील ध्येय:
१. समाजातील सर्व स्तरातील मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मुल्याधीष्टीत शिक्षण देणे.
२. डिजिटल शिक्षण व्यवस्था निर्माण करणे.
३. दर्जेदार भौतिक सुविधा निर्माण करणे.
४. उच्च दर्जाच्या सर्व सुविधांयुक्त विज्ञान व संगणकीय प्रयोगशाळा तयार करणे
५. मुलांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी INDOOR आणि OUTDOOR खेळांचीक्रीडा मैदाने तयार करणे.
६. स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शक केंद्र उभारणे.
७. मुलांनाउद्योजकबनविण्यासाठी व्यावसायीक शिक्षण व्यवस्था निर्माण करणे.
८. सर्व सुविधांयुक्त ग्रंथालय उभारणे व वाचन संस्कृती निर्माण करणे.
९. समुपदेशन केंद्राची स्वतंत्र स्थापना करणे.